शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

साखर घेऊन करायची काय? पुढच्या वर्षी परिस्थिती आणखी बिकट : सहकारमंत्र्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 23:14 IST

साखरेचे दर कोसळत असल्याने शासनाने साखर खरेदी करावी, अशी सार्वत्रिक मागणी होत आहे. मात्र, ही साखर खरेदी करून तिचे काय करायचे, असा सवाल सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी

कोल्हापूर : साखरेचे दर कोसळत असल्याने शासनाने साखर खरेदी करावी, अशी सार्वत्रिक मागणी होत आहे. मात्र, ही साखर खरेदी करून तिचे काय करायचे, असा सवाल सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

हुपरी (ता. हातकणंगले) येथील कार्यक्रमाला जाण्यासाठी देशमुख शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांना विचारले असता ते म्हणाले, शेवटी साखर घेऊन शासन तरी त्या साखरेचे काय करणार आहे. याहीपेक्षा पुढच्यावर्षी परिस्थिती बिकट असल्याचे सूतोवाचही देशमुख यांनी केले.

देशमुख यांना त्यांच्या ‘लोकमंगल’ समूहावर ‘सेबी’ने निर्बंध आणल्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, कंपनीच्या विस्तारासाठी आम्ही शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला. मात्र, ते विकताना त्यातील काही तरतुदी आम्हाला माहिती नव्हत्या. सीएनीही आम्हाला त्या गोष्टी सांगितल्या नाहीत आणि आता त्यातूनच हे निर्बंध आले आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या शेअर्सची रक्कम परत केली जाईल. अशा पद्धतीने ज्यांनी ज्यांनी शेअर्स गोळा केले आहेत त्या सर्वांनाच ही अडचण आली आहे.तासगाव कारखान्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलूकोल्हापूर : तासगाव-पलूस सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत आपण जातीने लक्ष घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलू, अशी ग्वाही सहकारमंत्री देशमुख यांनी दिली आहे. या मुद्द्यावर ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी शुक्रवारी सकाळी देशमुख यांची कोल्हापूर येथील विश्रामगृहावर भेट घेतली. त्यावेळी त्यांनी प्रा. पाटील यांना आश्वस्त केले. हा कारखाना गेले पाच हंगाम बंद आहे. कारखान्याची एका कंपनीला झालेली विक्रीही लढ्यानंतर रोखण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने